‘स्वाधार’ योजनेच्या नुतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत

रत्नागिरी : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ अर्ज नुतनीकरणाची (Renewal) ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी येत्या १५ सप्टेंबरपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त शीतल सोनटक्के यांनी केले आहे.
सन २०२५-२६ मध्ये लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांनी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज नूतनीकरण करावे. नूतनीकरणाची प्रक्रिया १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर आहे. विहित मुदतीनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. मुदतीत नूतनीकरण न केल्यास विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षाच्या लाभापासून वंचित राहू शकतात. अंतिम सादरीकरणानंतर (Final Submit) अर्जात कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी.
अर्ज नूतनीकरण प्रक्रियेदरम्यान कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी विहित मुदतीपूर्वी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.



