कळमुंडी बौद्धवाडी ग्रामस्थांचा ठाकरे शिवसेनेत जाहीर प्रवेश
आ. भास्कर जाधव, जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी केले स्वागत

चिपळूण : तालुक्यातील कळमुंडी गावच्या बौद्धवाडीतील सर्व ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते तथा गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्करराव जाधव आणि जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना प्रवेशकर्त्यांनी सांगितले की, “यापूर्वी आम्ही अन्य पक्षाचे काम करत होतो. मात्र सत्तेत असतानाही आमच्या वाडीचा अपेक्षित विकास झाला नाही. दुसरीकडे विरोधी पक्षाचे आमदार असूनही भास्करराव जाधव यांच्या माध्यमातून मतदारसंघात सुरू असलेल्या विकासकामांमुळे आम्ही प्रभावित झालो. त्यामुळे आमच्या वाडीने एकसंघपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
प्रवेशकर्त्यांनी पुढे “यापुढे आम्ही शिवसेना ठाकरे पक्षाच्या पाठीशी कायम राहू,” अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार भास्करराव जाधव यांनी सर्वांचे पक्षात स्वागत करत आपल्या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचा शब्द दिला.
उमरोली गटाचे जिल्हा परिषद सदस्य प्रमोद उर्फ पिंट्या निवळकर आणि युवा सेनेचे तालुका अधिकारी प्रीतम वंजारे यांच्या माध्यमातून हा पक्षप्रवेश पार पडला.
प्रवेशकर्त्यांमध्ये विकास मोहिते, विजय सावंत, किशोर मोहिते, अनिल मोहिते, श्रीकांत सावंत, सुदेश मोहिते, विश्वदीप सावंत, पंकज सावंत, क्रांतीदीप सावंत, हेमंत सावंत, आशिष सावंत, तुषार सावंत, किरण मोहिते, कुंदन मोहिते, साजन सावंत, रवींद्र सावंत, विकी सावंत, भगवान मोहिते, दिलीप कांबळे, संतोष मोहिते, विनोद सावंत, किरण सावंत, निलेश कांबळे, अशोक मोहिते, शैलेश मोहिते, सचिन सावंत, प्रथमेश कांबळे, नितीन सावंत, अरविंद सावंत, अजय मोहिते, जयेश सावंत, अमोल सावंत, श्रेया सावंत, अर्पिता मोहिते, वैशाली मोहिते, प्रतिभा सावंत, नीता मोहिते, संजीवनी कांबळे, विजया सावंत, अवंतिका मोहिते, भूमी सावंत, प्रेरणा कांबळे आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमाला तालुकाप्रमुख सुभाष जाधव, उपतालुकाप्रमुख संदीप चव्हाण, लक्ष्मण कोकमकर, उमरोली विभागप्रमुख संदीप घाग, पंचायत समिती सदस्य गौरव पाटेकर, सौ. सुप्रिया वंजारे यांच्यासह विभागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



