मुख्य बातमी

लडाखमध्ये भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले 

लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले

लडाख : लेहजवळच्या तांगस्ते भागात भारतीय लष्कराचे ‘चिता’ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातामधून ३ वरिष्ठ लष्करी अधिकारी थोडक्यात बचावले आहेत. त्यांना किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती सांगितली जात आहे. ही अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट कर्नल मेजर आणि जनरल ऑफिसर कमांडिंग सचिन मेहता हे प्रवास करत होते. या अपघातात तिघेही जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. लेहजवळच्या तांगस्ते भागात लष्कराचे चिता हे हेलिकॉप्टर कोसळल्याच्या घटनेनंतर एका अधिकाऱ्याचा सेल्फी व्हायरल होत आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरजवळ दोन अधिकाऱ्यांबरोबर बसलेल्या मेजर जनरल सचिन मेहता यांचा हा फोटो चर्चेचा विषय बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!