मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आमदार जाधव यांच्या एका फोनमुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र या जीवघेण्या रस्त्याचे रखडलेले काम गुहागर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांच्या एका फोनमुळे मार्गी लागले. यासाठी कुटगीरी येथील स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठानने (महाराष्ट्र राज्य) आमदार जाधव यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र हा रस्ता जीवघेणा झाला होता. या रस्त्याचे खड्डे बुजवणाचे वर्क ऑर्डर नोव्हेंबर आणि डिसेंबर २०२५ ला झाले होते; परंतु ठेकेदार हे काम अर्धवट सोडून गेले होते. या ठेकेदाराकडून आखाती देशात युद्ध चालू असल्यामुळे डांबराचे रेट वाढल्याचे सांगण्यात येत होते. या विषयाचा कुटगिरी (ता. गुहागर) येथील स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) यांनी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्याकडे पत्र देऊन हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे असा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. प्रतिष्ठानचे पत्र आमदारांच्या हातात देताच आमदार जाधव यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना फोन केला आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची तंबी दिली. त्यानुसार या रस्त्याचे काम चार दिवसांत पूर्ण करण्यात आले.

त्यामुळे स्व. बाळासाहेब खेतले प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रदीप तुकाराम खेतले, कुणाल खाकम तसेच यासाठी सहकार्य करणारे प्रतिष्ठानचे सदस्य दिलीप तुकाराम खेतले यांनी आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!