मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोली नगरपंचायतीने ५ धोकादायक इमारती आणि २७ कुटुंबांना बजावल्या नोटीसा

दापोली : लवकरच सुरू होणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दापोली नगरपंचायतीने सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील अतिधोकादायक ठरलेलया ५ इमारतींना आणि दरड कोसळण्याची भीती असलेल्या डोंगरभागातील २७ कुटुंबांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अधिकृत नोटिसा बजावल्या आहेत.

पावसाळ्यात जुन्या आणि कमकुवत झालेल्या इमारती कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. याचसाठी दापोली नगरपंचायत प्रशासनाने शहरातील ५ इमारती धोकादायक ठरवल्या आहेत. संबंधित इमारतींच्या मालकांना आणि रहिवाशांना या इमारतींमध्ये न राहण्याबाबत तसेच योग्य ती खबरदारी घेण्याबाबत प्रशासनाने लेखी आदेश दिले आहेत. शहरातील खोंडा भागातील डोंगराळ, चढउताराच्या भागात राहणाऱ्या नागरिकांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. पावसाळ्यात डोंगराचा भाग खचणे, दरड कोसळण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. डोंगरभागात वास्तव्यास असलेल्या २७ कुटुंबांना नगरपंचायतीने नोटिसा बजावली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!