मुख्य बातमी

भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू 

रत्नागिरी : भगवान परशुराम शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश प्रक्रिया २१ मेपासून सुरू करण्यात आली असून दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज सादर करावेत. प्रवेशासंबंधी माहितीकरिता प्रवेश प्रक्रिया समन्वयक विजय लक्ष्मण गिरकर – 7276212116 यांच्याशी संपर्क साधावा.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था चिपळूण येथे वीजतंत्री, तारतंत्री, जोडारी, कातारी, संधाता, यां. मोटार गाडी, यां. डिझेल, ओओसीपी, आयएमसीपी, एमएमसीपी हे व्यवसाय शिकविले जातात. तारतंत्री -२०, जोडारी -२०, संधाता -४०, यां. मोटार गाडी -२४, यां. डिझेल ४०, ओओसीपी -४८, आयएमसीपी -२०, एमएमसीपी -४० इतकी आहे. यामध्ये तारतंत्री व संधाता करिता शैक्षणिक पात्रता हि दहावी उत्तीर्ण/ अनुत्तीर्ण आहे व इतर सर्व व्यवसायांसाठी दहावी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता आहे. तसेच व्यवसायाचा कालावधी संधाता व यां. डिझेल, या व्यवसायाकरिता 1 वर्षाचा आहे व इतर सर्व व्यवसायांसाठी २ वर्षांचा कालावधी आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रमाणित कार्यपद्धतीची माहिती पुस्तिका ऑनलाईन स्वरूपात वरील संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अर्ज नोंदवून झाल्यावर उमेदवारांनी नजीकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला अर्ज निश्चित करावा व त्यानंतर विकल्प सादर करावे. प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांबाबत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये समुपदेशन करण्यात येत आहे. यामध्ये उमेदवारांना विविध व्यवसाय अभ्यासक्रमांची माहिती देण्यात येते.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यभरात एकूण ८५ व्यवसाय उपलब्ध असून १५४९३२ इतक्या जागा उपलब्ध आहेत. येणाऱ्या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ज्यादा मागणीचे तसेच आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ६५२ नवीन अभ्यासक्रमाच्या तुकड्या सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. तसेच जागतिक बँकेच्या सहकार्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच आयटीआय प्रवेशित उमेदवारांना प्रतिमाह देण्यात येणाऱ्या विद्यावेतन वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. विविध प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनाही लागू करण्यात आली आहे. दहावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आयटीआय अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियमानुसार बारावी उत्तीर्ण समकक्षता प्रदान करण्यात येते. तर दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त होण्यासाठी आयटीआय मध्ये प्रवेश घ्यावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!