मुख्य बातमी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ४ मे रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याला पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. त्यानुसार मे महिन्याचा लोकशाही दिन ४ मे रोजी दुपारी १ ते २ यावेळेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात होणार आहे.
लोकशाही दिनासाठी नागरिकांना प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरिकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.



