मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

पुरातत्त्व विभागाकडून गोपाळगड किल्ल्याची भूसंपादन प्रक्रिया सुरू

गुहागर (संदेश कदम) : तालुक्यातील ऐतिहासिक आणि राज्य संरक्षित स्मारक असलेला ‘गोपाळगड किल्ला’ आता पूर्णपणे शासकीय अखत्यारित आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. हा किल्ला खासगी जागेत असल्याने आणि त्यावरून पर्यटकांना खासगी जमीन मालकांकडून येणाऱ्या वाईट अनुभवांमुळे हा विषय चांगलाच तापला होता.

या सर्व वादाची गंभीर दखल घेत पुरातत्त्व विभागाने आता गोपाळगड किल्ल्याची जागा ताब्यात घेण्यासाठी अधिकृतपणे भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पर्यटकांमधील असंतोष दूर होण्यासोबतच किल्ल्याच्या संवर्धन व विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

भूसंपादनाच्या या निर्णयामुळे इतिहासप्रेमी, स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!