मुख्य बातमी

चांदोर (रत्नागिरी) येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत मुलींना प्रत्येकी दहा रोपांचे वाटप

रत्नागिरी : चांदोर ग्रामपंचायत येथे सामाजिक वनीकरण विभाग रत्नागिरीची कन्या वन समृद्धी योजने अंतर्गत १ वर्षातील ९ मुलींना प्रत्येकी १० रोपांचे वाटप करण्यात आले. सरपंच सौ. पुनम मेस्त्री, उपसरपंच सूर्यकांत तांबे व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी अनिल दळवी यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य उमेश गोताड, चंद्रकांत कोलगे, राजेंद्र बनकर, विशाखा फुटक, पूजा तोडणकर, ग्रामपंचायत अधिकारी आनंद कुडाळकर, अंगणवाडी सेविका माधवी फुटक, वेदिका पड्यार, कविता गोताड, निशिता कोलगे व सामाजिक वनीकरण विभागातील इतर अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!