मुख्य बातमी

रत्नागिरी-लाजूळफेरी पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात बहुजन समाज पार्टीचे रत्नागिरी विभाग नियंत्रकांना निवेदन

रत्नागिरी : रत्नागिरी-लाजूळ फेरी पूर्वीप्रमाणे सकाळी ८.२० वाजता सोडण्यात यावी, या मागणीसाठी रत्नागिरी विभाग नियंत्रकांना बहुजन समजा पार्टी रत्नागिरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

रत्नागिरी-लाजुळ गाडी पूर्ववत सुरू केल्यास लाजूळ गावातील शालेय विद्यार्थ्यांना एक तास पायी चालत जाण्याचा त्रास होणार नाही, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत वाहतुक अधिकारी श्री. यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विद्यार्थ्यांसाठी सहकार्य करण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी बहुजन समाज पार्टी रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा प्रभारी किशोर पवार, विधानसभा महासचिव राजू जाधव, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार, रत्नागिरी शहराध्यक्ष रूपेश कांबळे, प्रीतम सावंत उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!