मुख्य बातमी

तुरळ (संगमेश्वर) येथे तीन वाहनांचा अपघात

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दोन चारचाकी वाहनांमध्ये अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, धडकेच्या जोरामुळे एक दुचाकीही अपघातग्रस्त झाली. दोन वाहनांना धडक दिल्यानंतर कार थेट दुकानात घुसली. मात्र, सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत अथवा जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जीजे-०५-आरडी-७२६६ क्रमांकाची चारचाकी चिपळूणकडून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एमएच-०८-झेड-१९१८ क्रमांकाची चारचाकी संगमेश्वरकडून कडवईकडे जाण्यासाठी महामार्ग ओलांडत असताना दोन्ही वाहनांमध्ये जोरदार धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की, घटनास्थळी असलेली एक दुचाकीही त्यामध्ये सापडून उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातात दोन्ही चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी वाहनांतील प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या असून कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून अपघाताबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!