आबलोली रिक्षा व्यावसायिक मालक संघटनेतर्फे नववर्षाच्या प्रारंभी विविध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरी जिल्हा शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेना पुरस्कृत रिक्षा व्यावसायिक मालक संघटना आबलोली (ता. गुहागर) यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी नूतन वर्षाच्या प्रारंभी म्हणजेच १ जानेवारी २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी ८ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार आहे. त्यानंतर ९ वाजता महाआरती व तीर्थप्रसादाचे वाटप होईल. सायंकाळी ७ वाजता आबलोली, खोडदे गावातील स्थानिक मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर रात्री ९ वाजता लकी ड्रॉ सोडत भाग्यवान विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात येईल. रात्री १० वाजता रत्नागिरीतील श्री रवळनाथ रिमिक्स नमन मंडळातर्फे बहुरंगी, बहूढंगी नमन सादर केले जाईल. पौराणिक गण “सिंधुरासुरचा वध”, रंभा नृत्य व गणेश वंदना तसेच गवळण हा कार्यक्रम सादर होणार असून “गवळणींचा सुंदर नृत्याविष्कार आणि “मावशीची धमाल” कार्यक्रम त्यानंतर लेखक मनोहर होरंबे लिखित “श्रीकृष्ण लीला” हे वगनाट्य सादर होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन आबलोली रिक्षा व्यावसायिक मालक संघटनेचे अध्यक्ष सुभाष कदम, उपाध्यक्ष गोपीनाथ शिर्के, कोषाध्यक्ष अनिल साळवी, सचिव अजित मोहिते, सहसचिव प्रशांत कदम, सल्लागार प्रवीण भंडारी, धनदीप साळवी, प्रकाश चाचे, दौलत शिर्के, दिनेश पागडे, सदस्य मनोज भोजने, योगेश साळवी, दत्ताराम साळवी, मंगेश मास्कर, तुषार भोजने, समीर चाचे, सर्वेश पवार, मनोज पवार, प्रशांत गोणबरे, संदीप दिवेकर, अमित करंजकर, मोहिते, ऋषिकेश झगडे, सागर चव्हाण, प्रशांत सुर्वे, निखिल सुर्वे, सर्वेश सुर्वे, स्वप्नील सुर्वे, निरंजन सुर्वे, कृपेश गुरव यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे केले आहे.



