Uncategorized

शाश्वत विकास करायचा असेल तर, स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणे गरजेचे : डॉ. केतन चौधरी 

रत्नागिरी : “शाश्वत विकास करायचे असेल तर, स्थानिक उत्पादनावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. तसेच मत्स्य पदार्थांना मूल्यवर्धनाशिवाय पर्याय नाही, यासाठी प्रशिक्षणाची जबाबदारी कुलगुरु डॉ. संजय भावे यांनी अवगत केल्याप्रमाणे कोकण कृषी विद्यापीठ घेत असल्याचे सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी सांगितले.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात मत्स्य पदार्थ निर्मिती प्रात्यक्षिक व महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन नुकतेच केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यासाठी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे व विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी यांचे मार्गदर्शन, तर आसमंत फाऊंडेशनचे आर्थिक साह्य मिळाले.

प्रस्तावना संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर यांनी केली. याप्रसंगी मत्स्य व्यवसाय विभागाच्या मत्स्य विकास अधिकारी लतिका गावडे उपस्थित होता. त्यांनी मत्स्य मूल्यवर्धित पदार्थ निर्मिती या उद्योगाला यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षणांर्थीना शुभेच्छा दिल्या. यावेळी संशोधन केंद्राचे अभिरक्षक डॉ. हरीश धमगाये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, जीवशास्रज्ञ श्रीमती वर्षा सदावर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन वरिष्ठ संशोधन सहाय्यक अपूर्व सावंत यांनी केले.

या कार्यक्रम दरम्यान ‘माशाचे अन्नातील महत्त्व’ याविषयी डॉ. पागारकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच जवळा चटणी, कोलंबी लोणचे, कालवी लोणचे याचे प्रात्यक्षिक अपूर्व सावंत, वर्षा सदावर्ते, डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले आणि प्रा. सचिन साटम यांनी करून दाखविले.

सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांनी प्रशिक्षण घेऊन सुरुवातीस छोट्या प्रमाणात व्यवसाय सुरुवात करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

हा कर्यक्रम यशस्वी करण्यासाठी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रज्ञान येथील डॉ. राकेश जाधव, सुशील कांबळे, निलेश मिरजकर, रोहित बुरटे, प्रतीक यादव, श्री. पंकज, संदेश चव्हाण, शुभम कांबळे तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे अधिकरी डॉ. हरीश धमगाये, प्रा. नरेंद्र चोगले, प्रा. सचिन साटम, वर्षा सदावर्ते आणि अपूर्व सावंत तसेच मजूर सचिन चव्हाण, भूमी भाटकर, तेजस जोशी, योगेश पिलणकर, अभिजित मयेकर, उल्हास पेडणेकर, प्रशांत पिलणकर आणि केतन चव्हाण यांनी मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!