Uncategorized

भाजपा स्थापना दिवस आणि मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन या विषयावर रत्नागिरी विधानसभा बैठक संपन्न

रत्नागिरी : विशेष सखोल पुनरावलोकन या उपक्रमाविषयी आणि ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचा (भाजपा) स्थापना दिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन बैठक ३० मार्च रोजी आयोजित घेण्यात आली. ही बैठक भाजपा जिल्हा कार्यालय येथे ही बैठक झाली.

दादा ढेकणे यांची भाजपा प्रदेशाकडून ‘एसआयआर’साठी रत्नागिरी विधानसभा क्षेत्रासाठी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी दादा ढेकणे यांनी भाजपा स्थापना दिनानिमित्त राबविण्यात येणारे विविध कार्यक्रमांबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे एस आय आर यासाठी पक्षाने नियुक्त केलेले बीएलओ-२ यांना आपले काम समजावून सांगितले व त्यादृष्टीने काम करण्यास शुभेच्छा दिल्या.

त्यानंतर शहर सरचिटणीस नीलेश आखाडे, जिल्हा पदाधिकारी शेखर लेले, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके यांनी उपस्थितांना याबाबत मार्गदर्शन केले. शहर सरचिटणीस संदीप सुर्वे यांनी उपस्थितांचे आभार मानले. याच कार्यक्रमांमध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अशोक वाडेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

भाजपा स्थापना दिनानिमित्त राबविण्यात येणारे कार्यक्रम स्वच्छता मोहीम, कार्यालयातील पूजा, वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम, संपर्क अभियान, पक्ष ध्येयधोरणे याबाबत मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी आणि त्यांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिक संपर्क यांसारखे कार्यक्रम स्थापना दिनानिमित्त राबविण्यात येणार असल्याचे दादा ढेकणे यांनी सांगितले. यावेळी राजू भाटलेकर, संदीप नाचणकर, मनोज पाटणकर, बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख, नगरसेवक, जिल्हा व शहर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित  होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!