श्रद्धा महेश सामंत यांच्या शृंगार कलेक्शनचे थाटात उद्घाटन

बदलते फॅशन ट्रेंड्स, डिझाईन्स, व्हरायटी आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्राहकांची बदलती आवड या सगळ्याचा विचार करून नेहेमीच नवनवीन ज्वेलरी ड्रेस मटेरियल्स ग्राहकांना उपलब्ध करून देणारे “शृंगार कलेक्शन”.
२ एप्रिलला आमच्या शृंगार कलेक्शनचे उद्घाटन आदरणीय काकी म्हणजेच सौ. स्वरूपा रविंद्र सामंत यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. “श्रद्धा, तुझ्या व्यवसायाची वाटचाल मी पाहिली आहे. तुझ्या क्षेत्रातली तुझी प्रगती पाहून आनंद वाटतो ग” हे काकींचे शब्द खूप बळ देणारे आहेत.
मी या व्यवसायात गेली अनेक वर्ष आहे. नवीन दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी आमच्या एक जुन्या ग्राहक आल्या आणि त्यांनी सांगितलं, “दहा वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे एक ज्वेलरी सेट घेतला होता तो अजूनही मी वापरते. म्हणून मुद्दाम आज खरेदी करायला पुन्हा तुमच्याच दुकानात आले आहे.” आपण जे सचोटीने करतोय त्याची पोच पावती मात्र मिळते हे नक्की…
रत्नागिरीतल्या शृंगार प्रेमींसाठी सुरू केलेला व्यवसाय वाढत वाढत आता भारता बाहेरही पोहोचला आहे. श्रीलंका, यूएस,युके या देशातही आपल्या दुकानाच्या प्रॉडक्ट्स ना वारंवार मागणी असते. ऑनलाईन डिलिव्हरीच्या माध्यमातून आमचे प्रॉडक्ट्स त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. हे करत असताना ग्राहकाला जास्तीत जास्त व्हरायटी आणि क्वालिटी कशी देता येईल याकडे आम्ही नेहेमीच कटाक्षाने लक्ष देतो.
आमच्या या नव्या दालनाला शुभेच्छा देण्यासाठी उद्घाटनाच्यावेळी आमच्या अनेक जवळच्या लोकांनी हजेरी लावली. यात आवर्जून उल्लेख करावा अशा व्यक्ती.. वर्षा किरण सामंत, रत्नागिरीच्या प्रथम नागरिक शिल्पा सुर्वे, सुदेश मयेकर, दत्तात्रय उर्फ बाळू साळवी, विजय खेडेकर, निमेश नायर, सौरभ मालुष्टे, पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील, प्रवीण पवार, स्वप्नील मयेकर, विभाग प्रमुख मनोज साळवी, नगरसेविका प्रीती सुर्वे, श्रद्धा हळदणकर, पूजा पवार, वैभवी खेडेकर, मेधा कुलकर्णी, सायली पाटील, जागृती पिलणकर, राजू कीर, पंचायत समिती सदस्या कांचन नागवेकर, स्वरा वैभव देसाई, साक्षी कुमठेकर, संस्कृती पाचकुडे, रत्नागिरीतील यशस्वी हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी, बांधकाम व्यावसायिक अभय उर्फ विकी जैन, ओंकार भाटकर आणि कुटुंबीय, आनंद फडके, अनुश्री साळवी, संदीप मगदूम, निर्माण ग्रुपचे चंदन खानविलकर, विजू पाटील, प्रदीप कट्टे, क्रिस्टल ग्रुपचे सर्व सदस्य, हॉटेल गोपाळचे मालक लाल्या खातू, प्रथितयश सीए अभिजीत पटवर्धन, रत्नाकर जोशी, केदार पटवर्धन, प्रथितयश टॅक्स कन्सल्टंट राजेश सोहोनी, प्रसन्न पेठे, अद्वैत कुलकर्णी, संदीप आंबेकर, नितीन लिमये, फिरोज गवाणकर, अभी दुड्ये, तुषार साळवी, रजनीश परब, सर्व पत्रकार मित्र मंडळी, मंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या संपर्क कार्यालयातील महेशचे सर्व साथीदार, मित्रपरिवार खूप मोठ्या संख्येने तसेच माझ्या व्यवसायाच्या सुरुवातीपासूनच माझ्या पाठीशी कायम उभे असणारे जयू भाटकर उपस्थित होते. सिद्धेश वैद्य आणि कुटुंबीय, राजीव लिमये, स्वप्नील आणि सोनाली प्रभू आजगावकर खास शिरोड्याहून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले आणि हो…. ज्यांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्याशिवाय ही वाटचाल शक्य झाली नसती अशा माझ्या सासुबाई, माझी आई यांचीही उपस्थिती होतीच.
तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठीशी आहेत हे गृहीत धरूनच या नव्या दालनाला भेट देण्यासाठी तुम्हा सर्वांना आग्रहाचं आमंत्रण देत आहे.
श्रद्धा महेश सामंत
शृंगार कलेक्शन


