क्रीडामुख्य बातमी

क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड

सर गॅरी सोबर्स यांचे निधन : एका सुवर्ण युगाचा अस्त

वेस्ट इंडिज : वेस्ट इंडिजचे महान अष्टपैलू खेळाडू आणि क्रीडा इतिहासातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींपैकी एक असलेले सर गार्फिल्ड सोबर्स यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या केवळ दोन आठवडे आधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने क्रीडा जगतात शोक व्यक्त केला जात आहे.

सर गार्फिल्ड सोबर्स यांना क्रिकेटच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते. ते १९५४ ते १९७४ या काळात जवळपास दोन दशके वेस्ट इंडिज क्रिकेट संघाकडून खेळले. सोबर्स यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते एकाच वेळी जागतिक दर्जाचे फलंदाज, एक घातक वेगवान गोलंदाज, एक उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि एक विलक्षण क्षेत्ररक्षक होते. त्यांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास त्यांनी वेस्ट इंडिजचे ९३ कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले.

या काळात त्यांनी २६ शतके आणि ३० अर्धशतकांसह ५७.७८ च्या अविश्वसनीय सरासरीने ८०३२ धावा केल्या. त्यांच्या गोलंदाजीतील पराक्रमाचीही सर्वत्र दखल घेतली गेली; आपल्या अचूक आणि वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये २३५ बळी घेतले. इतकेच नव्हे तर, मैदानावर चित्त्यासारख्या चपळाईने त्यांनी १०९ झेलही घेतले. सोबर्स यांच्या प्रतिभेचा अंदाज यावरून येतो की, त्यानी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी, १९५३ मध्ये बार्बाडोसकडून प्रथम-श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

त्यांची अद्वितीय आणि जादुई प्रतिभा निवड समितीने तात्काळ ओळखली आणि पुढच्याच वर्षी, १९५४ मध्ये, त्याला वेस्ट इंडिज राष्ट्रीय संघाकडून कसोटी पदार्पण करण्याची सुवर्णसंधी मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर, सोबर्सला जगभरात आपले स्थान निर्माण करायला फार वेळ लागला नाही. १९५८ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळताना सोबर्सने आपले पहिले कसोटी शतक झळकावले, जे पुढे ३६५ धावांची एक ऐतिहासिक नाबाद खेळी ठरली. कसोटी डावातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा हा विश्वविक्रम पुढील ३६ वर्षे अबाधित राहिला आणि अखेरीस १९९४ मध्ये वेस्ट इंडिजचे महान फलंदाज ब्रायन लारा यांनी तो मोडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!