मुख्य बातमी

फोटोग्राफर असोसिएशन‌या वतीने राजापूरमध्ये मोफत सिनेमॅटीक कार्यशाळा

रत्नागिरी : फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन रत्नागिरी जिल्हा आणि फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका यांच्यावतीने आयोजित आणि सोनी कंपनी आणि सारडा ग्रुप सांगली पुरस्कृत ॲडव्हान्स सिनेमॅटिक मास्टर क्लास या कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप उद्या (२५ ऑगस्ट) सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत राजापूर येथील हॉटेल गुरुमाऊली येते होणार आहे.

ही कार्यशाळा संपूर्ण मोफत असून, यात सोनी कंपनीच्या वतीने अभिजीत पाबरेकर हे अद्यावत कॅमेऱ्याची माहिती करून देणार आहेत, तर शरद पोखरकर सिनेमॅटिक व्हिडीओग्राफीबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर व्हिडीओग्राफरनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि व्यावसायिक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन राजापूर तालुका अध्यक्ष प्रितेश देवळेकर, जिल्हा अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष कांचन मालगुंडकर, सचिव प्रवीण पाटोळे, खजिनदार सुरेंद्र गीते, संघटक संदेश टिळेकर यांनी केले आहे.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष गुरु चौगुले रत्नागिरी (9730414447) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!