मुख्य बातमी

जिल्हा शासकीय रुग्णालयात महिला दिन साजरा

रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री व मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि राजापूरचे आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा शासकीय रुग्णालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची सेवा करणाऱ्या कक्ष सेविका, परिचारिका, अधिपरिचारिका, परिसेविका तसेच कधीही प्रसिद्धी झोतात नसलेल्या महिला सफाई कर्मचारी यांना तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

त्याचप्रमाणे परिचारिकेचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी यांनाही प्रोत्साहित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. नुकत्याच पाहिल्याच प्रयत्नामध्ये सीएची पदवी प्राप्त झालेल्या अदिती प्रेरणा संदेश नागवेकर हिचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती इंगोले, शहर प्रमुख स्मितल पावसकर, डॉ. विकास कुमरे, डॉ. सांगवीकर, डॉ. शिरसाट, परिसेविका सावंत सिस्टर, सागर भिंगारे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन महिला तालुकाप्रमुख कांचन नागवेकर, उपजिल्हाप्रमुख विनया गावडे, उपतालुकाप्रमुख स्मिता भिवंडे, विभागप्रमुख शुभांगी पांडेय, रिया साळवी, ऐश्वर्या विचारे, साक्षी कुमठेकर, मेघना पाष्टे, संस्कृती पाचकुडे, स्वरा देसाई, विद्या बोंबले, स्वाती शिंदे, अपर्णा बोरकर यांनी केले.

या कार्यक्रमासाठी माजी पंचायत समिती सदस्य स्नेहल पाटील, शाखाप्रमुख अश्विनी भुरवणे, अपर्णा भोळे, कीर, राखी भोळे उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!