Uncategorized
न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडेचा दहावीच्या शंभर टक्के निकाल

रत्नागिरी : तालुक्यातील न्यू ईरा एज्युकेशन सोसायटी सैतवडे संचलित न्यू ईरा इंग्लिश स्कूल सैतवडे शाळेचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या प्रशालेने गेली अनेक वर्षे शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे.
या विद्यालयातील महेक जांभारकर हिने ८३.४० टक्के गुण मिळवून प्रशालेत प्रथम क्रमांक पटकाविला. हाझीरा जांभारकर हिने ७७.६० टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक, तर आयशा गुहागरकर हिने ७५.८० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
विद्यालयात संख्यात्मक व गुणात्मक दर्जेदार निकाल लागताच सर्व संस्था अध्यक्ष व पदाधिकारी, तसेच मुख्याध्यापक इम्रान अंतुले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.



