Uncategorized

सनातन राष्ट्राचा जयघोष करत रत्नागिरीतील हिंदुत्वनिष्ठांचे गोव्याकडे प्रस्थान

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले नगरी, फोंडा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’

रत्नागिरी : मानवजातीच्या परमकल्याणासाठी, तसेच रामराज्याच्या स्थापनेसाठी कार्यरत सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष या निमित्ताने फोंडा-गोवा येथे १७ ते १९ मे या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. फार्मागुडी, फोंडा येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव होत आहे. येथील सच्चिदानंद परब्रम्ह डॉक्टर जयंत आठवले नगरीत होणाऱ्या या महोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून सनातन संस्थेचे शेकडो साधक, हिंदू धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी ‘सनातन राष्ट्रा’चा जयघोष करत खासगी बसेस व अन्य चारचाकी वाहनानी गोव्याकडे प्रयाण केले. यावेळी हिंदुत्वनिष्ठांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या, तसेच वाहनांवर लावलेल्या भगव्या ध्वजांमुळे वातावरणात चैतन्य पसरले होते.

या प्रसंगी जेष्ठ साधक महेंद्र चाळके यांनी बोलताना सांगितले की, “सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून अनेक साधक, धर्मप्रेमी रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड, गुहागर देवरुख, लांजा, राजापूर या ठिकाणाहून गोव्यासाठी आज सकाळपासूनच मार्गस्थ झाले. अत्यंत उत्साही भावपूर्ण आणि आनंदी वातावरणात सर्वांचा प्रवास सुरू झाला.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!