महाराष्ट्र

रत्नागिरीतील २० पर्यटक श्रीनगरमध्ये

कारगिल (जम्मू काश्मीर) येथील हबीबुल्ला मिशन शाळेला व्हिजिट

रत्नागिरी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे काल (२३ एप्रिल) दहशतवादी हल्ला झाला असून, याठिकाणी रत्नागिरीतील २० पर्यटक असल्याची माहिती पुढे आली आहे. कुणाल देसाई यांचे शहरातील राम आळी येथे दिव्यांग मुलांचे क्लिनिक असून कारगिल (जम्मू काश्मीर) येथील हबीबुल्ला मिशन शाळेच्या व्हिजिटसाठी ते आपल्या कुटुंबीय आणि कर्मचारी वर्गासोबत सध्या काश्मीरला गेले आहेत. सध्या ते श्रीनगर येथे सुखरूप असून, २८ एप्रिल रोजी रत्नागिरीत परतणार असल्याची माहिती त्यांनी “रत्नदुर्ग डिजिटल मीडिया”शी संवाद साधताना दिली.

दरम्यान, ही माहिती समजताच राज्याचे उद्योग मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संबंधित पर्यटकांशी संवाद साधला असून ते सुरक्षित असल्याची खात्री केली आहे.

कुणाल देसाई यांचे शहरातील राम आळी येथे दिव्यांग मुलांचे क्लिनिक असून, याच संदर्भात ते कारगिल येथील हबीबुल्ला मिशन शाळेला व्हिजिट देण्याच्या उद्देशाने काश्मीर येथे गेले आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या क्लिनिकमधील ९ कर्मचारी तर उर्वरित ११ कुटुंबातील सदस्य आहेत. हे सर्व श्रीनगर येथे सुरक्षित असून घटनास्थळापासून सुमारे ५० ते ६० किलोमीटर अंतरावर आहेत. येत्या सोमवारी म्हणजेच २८ एप्रिलला हे सर्व रत्नागिरीत परतणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!