मातीचा जातीचा शेतकरी पुस्तकाचे बुधवारी पावसला प्रकाशन

रत्नागिरी : जांभूळआड (पूर्णगड, ता. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी जयंत गोपाळ फडके यांनी लिहिलेल्या ‘जातीचा मातीचा शेतकरी’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी (२९ जुलै) पावस येथे होणार आहे.
रत्नागिरीतील नामवंत दैनिकात प्रसिद्ध झालेल्या साप्ताहिक सदराचे हे संकलन आहे. त्यामध्ये कोकणातील शेती, शेतकरी आणि समाजमनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शेतीव्यतिरिक्त शिक्षण, आरोग्य, सामाजिक-आर्थिक प्रश्न आणि त्यावरील उपाययोजना असे पुस्तकाचे स्वरूप आहे.
पावस येथील श्रीराम मंगल कार्यालयात बुधवारी, गुरुपौर्णिमेदिवशी सायंकाळी चार वाजता प्रकाशन समारंभ सुरू होईल. हरचेरी येथील महालक्ष्मी नर्सरीचे विनोद प्रभुदेसाई यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. शेतीविषयी आस्था असलेल्या कोकणातील सर्वांनी या प्रकाशन समारंभाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



