
रत्नागिरी : जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिवसभरात मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदवला गेला असून एकूण १२५.८९ मिमी इतकी, तर सरासरी १३.९८ पावसाची नोंद झाली आहे. मिमी पर्जन्यमान इतके आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद संगमेश्वर तालुक्यात २२.७५ मिमी झाली असून, रत्नागिरी शहरात केवळ ५.७७ मिमी इतका किरकोळ प्रमाणात पाऊस झाला.
जिल्ह्यातील बहुतांश भागांत हलक्यापासून मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या असून, काही भागांत पावसाने उसंत घेतल्याचे चित्र आहे. हवामान विभागानुसार पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील पाऊस
दिनांक – 08/07/2025
१) मंडणगड – 18.75 मिमी
२) खेड – 15.00 मिमी
३) दापोली – 7.71 मिमी
४) चिपळूण – 19.56 मिमी
५) गुहागर – 12.60 मिमी
६) संगमेश्वर – 22.75 मिमी
७) रत्नागिरी – 5.77 मिमी
८) लांजा – 18.00 मिमी
९) राजापूर – 05.75 मिमी
आजचा एकूण पाऊस = 125.89 मिमी
आजचा एकूण सरासरी पाऊस -13.98 मिमी.


