मुख्य बातमी
रत्नागिरीत २१ जुलै रोजी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

रत्नागिरी : जिल्हास्तरावरील दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. जुलै २०२५ चा महिला लोकशाही दिन सोमवारी (२१ जुलै) सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी कळविले आहे.
लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.



