Uncategorized
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ एप्रिल रोजी

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. एप्रिल महिन्याचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन ६ एप्रिल रोजी दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) विश्वजित गाताडे यांच्याकडून देण्यात आली.
लोकशाही दिनासाठी नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने नागरीकांचे समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात.



