Uncategorized

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानअंतर्गत भाजपचा जिल्हा प्रशिक्षण वर्ग उत्साहात

दापोली : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान’ अंतर्गत भारतीय जनता पार्टी (भाजपा) रत्नागिरी उत्तर व दक्षिण जिल्हा प्रशिक्षण वर्ग पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज (२३ मे) तालुक्यातील हर्णै येथे मोठ्या उत्साहात झाला. सामूहिकता, शिस्त आणि सातत्य या मूल्यांच्या बळावरच भाजपा अधिक सक्षम होत असल्याचे नमूद करत कार्यकर्त्यांना संघटनात्मक बळकटीसाठी प्रेरित करण्यात आले.

दापोली भाजपाच्या विचारधारेचा प्रभावी प्रसार करत तळागाळातील कार्यकर्त्यांना अधिक सक्षम, प्रशिक्षित आणि संघटनात्मकदृष्ट्या मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रशिक्षण वर्ग अत्यंत उपयुक्त ठरले. याप्रसंगी भाजपा आमदार श्रीकांत भारतीय, भाजपा प्रवक्ते तथा बृहन्मुंबई महानगरपालिका नगरसेवक व गटनेते गणेश खणकर, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा नेते तथा खेडचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, माजी आमदार सूर्यकांत दळवी, भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, भाजपा रत्नागिरी माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष संजय आखाडे, भाजपा खेड तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते रहीम सहिबोल, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, भाजपा युवा मोर्चा रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ॲड. मिलिंद उर्फ दादू नांदगांवकर, नगराध्यक्ष उर्मिला उदय पाटणे-शेट्ये, नगरसेविका तथा भाजपा महिला मोर्चा खेड शहराध्यक्ष आशा सनगरे, प्रीती चिखले, राहुल पाटणे, वैजेश सागवेकर, मंदार आपटे, अजय तोडकरी, सुयश उर्फ बॉबी खेडेकर, सोशल मीडिया प्रमुख सर्वेश पवार, ओवेस चौगुले, अक्षय सनगरे, अनिकेत पवार, प्रणव मापुस्कर, तुषार पवार, स्वराज गांधी, प्रथमेश सुर्वे, विजय गुप्ता तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!