मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

साखरोळी येथे सापडला मानवी सांगाडा; ओळख पटविण्यासाठी पोलिसांचा तपास वेगात

खेड : तालुक्यातील साखरोळी येथील पेट्रोल पंपाच्या पुढे असलेल्या वळणाजवळ रविवारी (२१ जून) सायंकाळी मानवी सांगाडा आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून अवशेष ताब्यात घेतले. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, त्यादृष्टीने पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, सांगाड्याजवळ बनियन आणि ट्रॅक पॅन्ट आढळून आल्याने हे अवशेष पुरुष व्यक्तीचे असावेत, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र याबाबतचा अंतिम निष्कर्ष वैद्यकीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासणीसाठी हे अवशेष कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, हा प्रकार घातपाताचा आहे की अन्य काही कारणामुळे संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक विवेक अहिरे आणि पोलीस उपनिरीक्षक केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरत असून खेड, दापोली आणि परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. ओळख पटविण्यासाठी काही नागरिकही पोलिसांशी संपर्क साधत असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक विवेक अहिरे म्हणाले, “खेड, दापोली आणि परिसरातील मिसिंग व्यक्तींची माहिती तपासली जात आहे. ओळख पटविण्यासाठी काही लोक येत आहेत. आम्ही सर्व बाजूंनी तपास करत असून आवश्यकता भासल्यास संबंधित अवशेषांची डीएनए चाचणी करण्याची तयारी देखील ठेवली आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!