Uncategorized
कुवारबाव येथील उतारावर ट्रक उलटला
चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अनर्थ मोठा अनर्थ टळला

रत्नागिरी : रेल्वे स्टेशनवरून शहराकडे येणाऱ्या रस्त्यावरील तीव्र उतारावर ट्रकचा आज (२९ जून) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. शहराच्या दिशेने येत असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.
रेल्वे स्टेशनवरून खाली येत असताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी रस्त्यावर समोर अनेक वाहने होती. मात्र, समोरच्या वाहनांना धडक बसू नये आणि लोकांचे प्राण वाचावेत यासाठी ट्रक ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत त्याने समोरच्या गाड्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक थेट रस्त्याच्या कडेला वळवला आणि यात ट्रक रस्त्याशेजारी कलंडला.
या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असले, तरी ड्रायव्हरच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.



