मुख्य बातमी

मेर्वी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

गावखडी : रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्या निमित्त या कार्यक्रमाच्या प्रारंभीस शालेय स्वराज्य मंत्रीमंडळाचे मुख्यमंत्री सोहम खरडे याच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला, तर शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ उपमुख्यमंत्री पूर्वी फडके हिच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर, उपशिक्षिका भारती तायशेट्ये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती.

लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यानंतर मेर्वी शाळेचे मुख्याध्यापक हिदायत भाटकर, विषय शिक्षिका शर्वरी करगुटकर उपशिक्षिका भारती तायशेट्ये, उपशिक्षक चंद्रशेखर पेटकर आदी शिक्षकांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद चंदुरकर, शिक्षण तज्ञ मंगेश म्हादये यांंनी भेट दिली आणि शाळेत राबविलेल्या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्व शिक्षक वृंदांचेआणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

छाया – दिनेश पेटकर, गावखडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!