रत्नागिरी पालिका शाळा क्र. १९ आंबेशेत येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

रत्नागिरी : श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यामंदिर रत्नागिरी नगरपालिका शाळा क्र. १९ आंबेशेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त या कार्यक्रमाच्या प्रारंभीस या शाळेचे मुख्याध्यापक नागेंद्र कणमुसे यांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी विनय कांबळे, शुभम पेटकर, उपशिक्षिका वर्षा म्हादे आणि विद्यार्थी उपस्थिती होते. लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यानंतर आंबेशेत शाळेचे मुख्याध्यापक श्री. कणमुसे, उपशिक्षिका सौ. म्हादे, उपशिक्षक श्री. कांबळे, श्री. पेटकर आदी शिक्षकांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले.



