रत्नागिरी पोलीस दलाकडून गोपाळगडाची स्वच्छता
रत्नागिरी : जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाने २ जून रोजी ऐतिहासिक गोपाळगड किल्ला येथे स्वच्छता अभियान राबवून किल्ला परिसराची साफसफाई केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
गोपाळगड हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा सागरी किल्ला असून त्याचे संवर्धन करणे ही महत्त्वाची भूमिका आहे. सद्यस्थितीबाबत उपस्थित प्रश्नावर शासन स्तरावर आवश्यक कार्यवाही सुरू असून संबंधित सर्व बाबींची दखल घेण्यात आलेली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवा, अपप्रचार किंवा दिशाभूल करणाऱ्या संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही तक्रार, माहिती अथवा संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ डायल ११२, रत्नसेतू चॅटबॉट किंवा आपल्या नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



