मुख्य बातमी

‘अभाविप’तर्फे (रत्नागिरी शहर) लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात साप्ताहिक ‘शिव वंदना’ उपक्रमाचा शुभारंभ 

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे लोकनेते शामराव पेजे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आज साप्ताहिक ‘शिव वंदना’ उपक्रमास उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यावेळी अभाविप जिल्हा संयोजक श्रावणी प्रभू-महाजन तसेच रत्नागिरी शहर मंत्री ज्ञानेश्वर चंदनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवत उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन, कार्य, विचार आणि राष्ट्रनिर्मितीचा आदर्श समजावा, तसेच शिव-शंभूंच्या विचारांनी प्रेरित होऊन युवकांनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, या उद्देशाने दर सोमवारी सायंकाळी ६.०० वाजता महाविद्यालयाच्या मैदानावर हा उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहे.

शिव वंदनेसह प्रत्येक आठवड्यात विविध समकालीन, ऐतिहासिक व राष्ट्रीय विषयांवर अभ्यासमंडळाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!