आम्ही शेतकरी- कृषीकोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सर्वाधिक पाऊस

म्हसळ्यात भातशेती लावणी ९७ टक्के पूर्ण : भात पिकाखाली क्षेत्र होत आहे कमी

म्हसळा (संजय खांबेटे) : रायगड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची (१६५७.३ मिमी) नोंद म्हसळा तालुक्यात, तर सर्वांत कमी खालापूर तालुक्यात (९८९.१ मिमी) झाली आहे. तालुक्यात खरीप हंगामात भात पिकाबरोबरच नागली, वरी, तूर आणि भाजीपाला ही पिके सुद्धा घेतली जातात.

चालू वर्षी खरीप हंगामात तालुक्यात भात १२३८.८३ हेक्टर, नागली ७२.५० हेक्टर, वरी १०.०० हेक्टर, तूर (बांधावर पिक) ७.५ हेक्टर, हळद १६.०० हेक्टर, भाजीपाला १.९६ हेक्टर ऐवढ्या क्षेत्रावर विविध पिकांची लागवड होत आसल्याची माहिती कृषी अधिकारी नरेश जामकर यांनी दिली.

म्हसळा तालुक्यात भात पिकाखालील क्षेत्र झपाट्याने कमी होत आहे. सन २०२२ साली भात पिक २२६० हेक्टर , सन २०२३ साली १९०५,सन २०२४साली १३६६.७०, आता सन २०२५साली केवळ १२९८ हेक्टर क्षेत्रावर केवळ लागवड झाली आहे. खरीप हंगामात बहुतांश शेतकरी सुवर्णा,वाडा कोलम, रुपाली, कर्जत ९, रत्नागिरी ८, चिंटू, जया, या जातीचे वाणांची लागवड करतात .वास्तविक पहाता शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि शेतकरी हा त्याचा आत्मा आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा कृषी विभाग फार मोठ्या प्रमाणावर कृषी विषयक संशोधन व योजना करत असताना पिका खालील क्षेत्र कमी होणे ह्याचा आभ्यास होणे आवश्यक आहे असे मत काही जाणकार शेतकऱ्यांचे आहे.

“तालुक्यांतील बहुतांश मजूर गावाकडून शहराकडे स्थलांतरित होत आहेत, त्यामुळे मजुरांची कमतरता भासत आसते, हल्ली भात पिकासाठी हेक्टरी रुपये २५ते ३० हजार खर्च येत असतो,” असे बहुतांश शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!